उस्मानाबाद:-कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून बापाने केला मुलीचा खुन

 1,477 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० सप्टेंबर । उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला ; उस्मानाबाद:-याबाबत सविस्तर माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे काजल मनोज शिंदे ही विवाहित मुलगी माहेरीच रहात होती.

काजलच्या वडिलाने घरी मटण आणले होते. काजलच्या आईने घरात मटण बनविले परंतु काजलचे काही कारणास्तव दुर्लक्ष झाल्यामुळे हे मटण कुत्र्याने खाल्ले.

कुत्र्याने मटण खाल्ल्यामुळे काजल आणि तिच्या आईमध्ये भांडणे सुरू झाली. हे भांडण सुरु असतानाच मद्यप्राशन करून आलेल्या बापाने नशेत आपल्या मुलीवरच गोळी झाडली. या गोळीबारात मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीच्या छातीवरच गोळी झाडल्याने तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली.

हा प्रकार समजल्यानंतर मयत काजलचे नातेवाईक विशाल जयराम भोसले यांनी तिला तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना काजलचा मृत्यू झाला.

तसेच गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी काजलचा पती मनोज सुनिल शिंदे, रा. कार्ला यांसही ठार मारण्याची धमकी दिली. मनोज सुनिल शिंदे यांनी दिलेल्या तक्ररीवरुन भा.दं.सं. कलम- 302, 504, 506, 34 अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

गुन्ह्याच्या घटनास्थळी तुळजापूर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीमती सई भोरे-पाटील यांसह नळदुर्ग पो.ठा.चे सपोनि- श्री. सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.