धनगर समाजास अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा ; मल्हार आर्मी शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने यांची मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना मागणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० सप्टेंबर । पिंपरी । मल्हार आर्मी शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने यांनी धनगर समाजास अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा म्हणून ई मेल द्वारे पत्र पाठवून केली त्यांनी पत्रात नुकतेच केद्र सरकारने कर्नाटक व युपीसह पाच राज्यातील विविध समुदायाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला त्या त्या राज्याने केद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठविला नव्हता , केंद्राच्या सुचीत धनगर समाज ३६ नंबरला* *आहे , महाराष्ट्रात धनगड समाज नसुन धनगर समाज मोठ्या प्रमाणात असुन पारंपारिक व्यवसाय मेंढपाळ बांधव करत आहे आपण बारामती मध्ये उपोषणाला बसलेल्या धनगर समाज बांधवाना सत्ते येण्या अगोदर शब्द दिला होता की सत्तेत आल्यास पहिल्याच कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते या बाबी निर्देशनास अणुन दिल्या सध्या राज्यात आपले सरकार आहे तरी आपण धनगर समाजास अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावे असा प्रस्ताव केद्र सरकारला पाठवावा व केद्र सरकार धनगर समाजला अनुसूचित जमातीत समावेश करावा अशी विनंती करावी हि विनंती मा.मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना ई मेल द्वारे पत्र पाठवून विनंती केली.


मल्हार आर्मी संस्थापक अध्यक्ष श्री सुरेशभाऊ का॓बळे व राज्य , जिल्हा कार्यकारिणी पदाअधिकारी मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन धनगर आरक्षण बाबत चर्चा करण्याचे पुढील नियोजन आहे मल्हार आर्मी शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने यांनी माहिती दिली*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *