![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २२ सप्टेंबर । सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. याबाबत भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) ट्विटव्दारे इशाराही देण्यात आला आहे. विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठवाड्यात 22 सप्टेंबर आणि मध्य प्रदेशात 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
याशिवाय IMD नं ट्विटव्दारे सांगितलंय की, 22 सप्टेंबर रोजी पूर्व राजस्थान (Rajasthan) आणि उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, 22 ते 24 दरम्यान अरुणाचल प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान आसाम आणि मेघालयात पावसाची शक्यता आहे. तर आज नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये 2-3 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट अहवालानुसार, पुढील चार ते पाच दिवस दिल्ली आणि एनसीआरमध्ये हलका पाऊस सुरू राहणार आहे. गेल्या 24 तासांत दक्षिणपूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पाऊस पडला आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. तर, आज मध्य महाराष्ट्र आणि बिहारमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.