महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ सप्टेंबर । राज्यात एकीकडे सत्तासंघर्षावरून राजकीय वाद सुरू असतानाच, दुसरीकडे राज्यात विधान परिषद निवडणुकीचा (Election) बिगुल वाजला आहे. नाशिक आणि अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागात शिक्षक कोट्याची निवडणूक होणार आहे. १ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होईल तर ३० डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. (Vidhan Parishad Election 2022 Latest News)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे भिजत असले, तरी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील, ना.गो.गाणार तर पदवीधर मतदार संघाचे डॉ. रणजित पाटील, डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाल ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे.
विक्रम काळे हे औरंगाबाद, बाळाराम पाटील कोकणातून तर ना. गो. गाणार हे नागपूरमधून शिक्षक मतदार संघातून निवडून आले आहेत. पदवीधर मतदार संघातून आमदार डॉ. पाटील हे अमरावती तर डॉ. तांबे हे नाशिकमधून निवडून आले आहेत. या पाचही आमदारांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची ७ जानेवारी २०२३ रोजी मुदत संपत आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची मागील मतदार यादी वापरली जात नाही. त्यामुळे १ नोव्हेंबर २०२२ पासून होणार नवीन मतदार नोंदणी. १ ऑक्टोबर से ७ नोव्हेंबर दरम्यान पदवीधर व शिक्षक मतदारांची नोंदणी. २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.