High Court : अनिल देशमुखांची दिवाळी जेलबाहेर?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज गेल्या सात महिन्यापासून प्रलंबित होता. बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च (Mumbai High Court) न्यायालयात सुनावणी होती. ही सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निर्णय हा राखून ठेवलेला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवळी हे जेलबाहेर होणार की नाही हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या सात महिन्यापासून जामीन अर्जावर सुनावणी झाली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयात सुनावणी तर झाली पण निर्णय काय तो अद्यापही समजू शकलेला नाही. उच्च न्यायालयात जामीन अर्जावर प्रभावीपणे सुनावणी होत नसल्याची खंत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत सुनवाणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुनावणी प्रक्रिया तर पूर्ण झाली पण देशमुख हे जेलमध्ये की जेलबाहेर हा निकाल अद्याप समोर आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *