शिवसेनेचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागणार आहे. शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे. मात्र, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची मागणी आहे. यासाठी शिवसेनेने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहीले आहे.

शिवसेनेचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती जानावळे यांनी केली आहे.

अंधेरी विधानसभेची जागा भाजप लढवणार आहे. शिंदे – फडणवीस यांच्यातील बैठकीत पोटनिवडणूकीमध्ये भाजप आपला उमेद्वार उतरवणार असल्याची चर्चा झाल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे.

या निवडणुकीची जबाबदारी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर आहे. भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. मुरजी पटेल यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आल्याचे समजते.

तर, रमेश लटके यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असल्याने ती जागा शिंदे गटाला द्यावी असा एक मतप्रवाह होता.
मात्र, लटके यांच्या पत्नींना शिवसेनेनं ऊमेदवारी दिल्याने आणखी जास्त सहानुभूती मिळण्याची शक्यता लक्षात घेत ही जागा भाजपला सोडण्याचा निर्णय झाल्याची सुत्रांची माहीती आहे.

दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र पाठवले आहे.

स्वर्गवासी पतीच्या जागेवर लढणान्या महिलेचा आदर म्हणून आपण अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करून नवदुर्गेच्या महाराष्ट्राची स्त्री सन्मानाची परंपरा कायम ठेवाल आणि अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करून श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांना सन्मानाने विधानसभेत पाठवाल हीच भारतीय जनता पक्षाची स्व. रमेश लटके साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असे या पत्रात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *