महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ ऑक्टोबर । उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मुलायमसिंह यादव हे सध्या 82 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत आहे.
पीएम मोदींनी अखिलेश यादव यांच्याकडून फोनवरून चर्चा करत मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली आहे.
उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री, श्री मुलायम सिंह यादव जी के अस्वस्थ होने की जानकारी मिलने पर मैंने उनके पुत्र अखिलेश यादव जी से फ़ोन पर बात करके उनका कुशल क्षेम जाना है। ईश्वर से यही प्रार्थना है कि वे जल्द से जल्द स्वस्थ हों।
— Rajnath Singh (@rajnathsingh) October 2, 2022
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे की, “उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृती खालवल्याची माहिती मिळताच मी त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्याशी फोनवर बोललो. मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतली. माझी प्रार्थना आहे की, ते लवकर बरे व्हावेत.”