Dasara Melava : …. नाही तर कायदा त्याचं काम करेल ; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑक्टोबर । भाषण योग्य भाषेत करा नाही तर कायदा त्याचं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. भाषणात अतिशयोक्ती अलंकारही वापरायला हरकत नाही पण कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अप्रत्यक्ष फडणवीसांनी दिला आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची (dasara melava shivsena) तयारी अंतिम टप्प्यात आहे. शक्तिप्रदर्शनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी काही लाख कार्यकर्ते जमवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतून किमान 50 हजार तर मुंबईबाहेरुन 50 हजार कार्यकर्ते जमवण्याची रणनीती आखण्यात आली.

दसरा मेळाव्यासाठी नागपुरातून जवळपास 50 बसेसमधून शिंदे समर्थक मुबंईकडे रवाना होतील. अडीच हजार शिंदे समर्थक शिवसैनिक मुंबईत बीकेसीकडे दसरा मेळाव्यासाठी निघतील. शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी नाशिक ग्रामीण भागातून 337 खासगी बस आणि 424 खासगी वाहने सोडण्यात येणार आहे. नाशिक ग्रामीण भागातून 18 हजार नागरिक मुंबईत उद्या रवाना होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *