नांदेड ; हिमायतनगर तालुक्यातील अंदेगाव येथे आगीत बारा घरे व जनावरांचे गोठे जळून खाक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड :- अंदेगाव येथील त्या अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल… अंदेगाव येथे मुध्दामहुन लावण्यात आलेल्या आगीत बाराघरे जनावरांचे गोठे जळून खाक…वेळीच सतर्कतेने जीवितहानी टळली.. हिमायतनगर तालुक्यातील अंदेगाव येथे दी 28/4/2020रोजी रात्रीच्या 12:50ते 1:00च्या दरम्यान अग्नीचा लोळ पाहून वेळीच तेथील रहिवाशानी झोपलेल्या लोकांना घरा बाहेर काडून होणाऱ्या जीवितहानीस आळा बसवण्यात यश आले असले तरीही लोकडाऊन मुळे शेतात पिकवलेला कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, सोयाबीन, तशीच घरात होती पण बघता बघता आगीने आदी 3 घरे व 4 गोटे घरातील शेतीमाल रोखरक्क्म संसारउपयोगी सामान जळून खाक झाले आहे आगीने लवकरच रोद्र रूप धारण केल्या मुळे कोणतेच सामान घरा बाहेर काढन्यात यश आले नाही.वेळीच हिमायतनगर येथील अग्नीशमन गाडी आली असती तर एवढे नुकसान झाले नसते असे ग्रामस्थांचे त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले व शेतकरी कुटूंब उघड्यावर पडले आहे. आग का लावण्यात आली याचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस तपासात बांबूला चिंद्या बादलले अर्ध वट जळालेला टेम्बा व एक इंधन भरून आणलेली रिकामी बॉटल भेटली आहे. जुने अंदेगाव येथील हनुमान मंदिर जवळच्या गल्लीत घरे व जनावरे ठेवण्यासाठी अगदी चिटकून आहेत.

त्या रात्री अचानक 3घरे 4 गोठे लागलेल्या आगीत बगताबघता भक्ष झाली हिमायतनगर पंचायत अगदी मिनिटाच्या अंतरावर असल्या मुळे तेथील अग्नीशमन गोडीसाठी फोन केला असता तेथील कर्मचारीने उडवा उडवीचे उत्तर दिले व काही ही आयकून घेण्याच्या मनःस्तिथीत नसल्याचे दिसून आले असल्या मुळे 40 किलो मिटर भोकरहुन अग्नीशमन गाडी येऊन आग वीजवण्यास 2 ते अडीच तास लागले आहे. हिमायतनगर पंचायत येथे जिल्हाप्रशासनाने अग्नीशमन गाडी दिली पण तिला चालवणारे प्रशिक्षित लोक हाताळण्यासाठी दिले नाहीत. आदीच कमीकर्मचारी असून ती ही गाडी चालू शकत नाहीत हिमायतनगर पंचायतचे हाल अग्नीशमन गाडी असून वळबा नसून खोळंबा अशी गत झाली आहे एका नाव न टाकण्याच्या अटीवर अशे सागितलेकी गाडी आल्यापासून जागेवरच नादुरुस्त झाली आहे. प्रशासनाने वेळीचं गाडी सोबत तिला हाताळणारे कर्मचारी दिले असतेतर आज आमचे एवढ्या प्रमाणात नुकसान झाले नसते असे ग्रामस्तानी आ.माधवपाटील जवळगाव याना सांगितले आहेत व मा.कर्तव्यदक्ष जिल्हाअधिकारी ड्रा. विपीन ईटनकर यांनी जातीने लक्ष घालून त्या उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या कर्मचारी व लाखोंची अग्नीशमन गाडी बंद ठेवणाऱ्या अधिकारीवर कार्यवाही करावी  अश्या प्रकारचे निवेदन ग्रामस्थ देणार असल्याचे सागितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *