Gold-Silver : सोने-चांदीच्या किमतीमध्ये आज घट; जाणून घ्या आजचे भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ ऑक्टोबर । Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६१,५०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,८५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,२०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१५ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *