महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ ऑक्टोबर । महागाईच्या युगात सरकारने जनतेला आणखी एक झटका दिला आहे. सरकारने दिल्ली (Delhi NCR) एनसीआरमध्ये सीएनजीच्या (CNG Rate) किमतींमध्ये 1 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढलेल्या किमती आज सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजेच 8 ऑक्टोबरपासून लागू होतील. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त कर्नाल, मुझफ्फरनगर आणि कानपूरवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. परिणामी सीएनजी वाहनधारकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहे. (cng price hike know latest rates sc )
IGL hikes the price of Domestic Piped Natural Gas (PNG) in Delhi to Rs 53.59 per SCM. The new price will come into effect from tomorrow, October 8th.
For Ghaziabad, Noida & Greater Noida, the PNG price has hiked to Rs 53.46 per SCM, while in Gurugram, it'll cost Rs 51.79 per SCM pic.twitter.com/aUDdM8Gvg6
— ANI (@ANI) October 7, 2022
दिल्लीत किंमत 78.61 रुपये प्रति किलो
सीएनजी (CNG) गॅसचा पुरवठा करणारी कंपनी आयजीएलच्या म्हणण्यानुसार, आता दिल्लीत (CNG Price in Delhi) सीएनजीची किंमत 78.61 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचदरम्यान नोएडा-ग्रेटर नोएडा (CNG Price in Noida- Greater Noida) मध्ये त्याची किंमत 81.17 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गाझियाबादमध्ये सीएनजीची (CNG Price in Ghaziabad) किंमत आता 81.17 रुपये प्रति किलो असेल. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये (CNG Price in Gurugram) सीएनजीची किंमत आता 86.94 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
या शहरांमध्येही सीएनजीचे दर वाढले
दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त कर्नाल, मुझफ्फरनगर आणि कानपूरमध्येही सीएनजीच्या दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सरकारने नुकतीच नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर सीएनजीच्या दरात वाढ होण्याची भीती होती, ती अखेर शुक्रवारी रात्री उशिरा खरी ठरली.
रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली
LPG म्हणून वापरल्या जाणार्या LPG गॅस सिलिंडरची किंमत 1050 वर पोहोचली आहे. सरकारने काही महिन्यांपूर्वी या सिलिंडरवरील अनुदान पूर्णपणे रद्द केले आहे. त्यामुळे आता या महागड्या सिलिंडरचा भार नागरिकांना सहन करावा लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आगामी काळात सीएनजी-एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग झाल्यास आश्चर्य वाटायला नको.