महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ ऑक्टोबर । चिचंवड । रविवारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5-8 मध्ये चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात श्री नटेश्वरसं नृत्य कलामंदिर ह्या संस्थेचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला . ह्या कार्यक्रमास नृत्यालंकार गुरू सौ पायल गोखले प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. संस्थेच्या एकूण 70 विद्यार्थिनींचा ह्या मध्ये सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालिका आणि गुरू सौ शिल्पा भोमे ह्यांच्या शिवस्तुतीनी झाली. त्यानंतर त्यांनी 11 मात्रेचा रुद्रताल सादर केला. त्यात त्यांनी थाट, आमद, तोडे, दोहरा परण , मिश्र जाती परण, तत्कार, ईत्यादी रचना प्रस्तुत केल्या आणि अभिनयपक्षात गतभावात द्रौपदीचे मनोगत, तिचे चीरहरण व युद्ध प्रसंग संवादाची भर टाकून प्रस्तुत केला. त्यानंतर संस्थेच्या विद्यार्थिनींनी पावसाची परी हे बालगीत , शिवतांडव , गायेजा , आवत मोहन हे कृष्णगीत , विशारदच्या विद्यार्थिनींनी 13 मात्रांचा रासताल , संबलपुरी हे लोकनृत्य, तू ही तू हे स्त्रीची रूप दाखवणारे गीत , त्रिवट, आणि कार्यक्रमाच्या शेवटी गुरू सौ शिल्पा भोमे आणि त्यांच्या जेष्ठ विद्यार्थिनींना फ्युजन केले .कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास संवादिनीला श्री उमेश पुरोहित व तबलावादनाला श्री विवेक भालेराव ह्यांनी साथसंगत केली . तसेच गतभावासाठी स्त्री संवाद सौ श्रद्धा गाडेकर आणि पुरुष संवाद श्री ऋषिकेश पांडे ह्यांनी दिले. सौ प्रणिता बोबडे ह्यांच्या उत्कृष्ट निवेदनाची साथ मिळाली.