![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । नाशिकमध्ये अपघातानंतर पेटलेल्या बसमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळीच घडली असताना पुन्हा एका बसने पेट घेतल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकहून वणी गडावर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला आग लागली आहे. ही घटना सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली असून स्थानिकांनी आणि प्रशासनाने मिळवून आग विझवली आहे तर या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून बसला आग लागल्यानंतर प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला आहे. तर परिवहन महामंडळाच्या या बसचे मोठे नुकसान झाले असून कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर मार्गावर वाहतूककोंडी झाली आहे.