महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी जनावरांनी धडक दिली आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तय हानी झाली नाही; मात्र, सलग दुसऱ्या घटनेनंतर म्हशीं मालकाविरोधात रेल्वे पोलिसांनी रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४७ अंतर्गत गुन्ह्याची नोंदविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान अत्याधुनिक – हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून सुरू केली होती. या गाडीला सुरू होऊन एक आठवड्या सुद्धा झालेला नाही. तर सलग दोनदा वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला अपघात झाला आहे. पहिला अपघात गुरूवारी झाला. ज्यामध्ये ट्रेन क्रमांक 20901 वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईहून अहमदाबादला येत होती. यादरम्यान वटवा ते मणिनगर स्थानकाजवळ म्हशींचा कळप रेल्वे मार्गावर आला.
वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची आणि म्हशींची जोरदार धडक झाली. या धडकेत चार म्हशीं ठार झाल्या असून नव्या कोऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरा अपघाता शुक्रवारी घडला आहे.ट्रेन गांधीनगरहून मुंबईला जात होती. दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी कंझरी ते आणंद दरम्यान एक गायीनी रेल्वे रुळावर आल्यानं वंदे भारत एक्स्प्रेसची पुन्हा धडक झाली या दुर्घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तय हानी झाली नाही. मात्र,वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा पुढील भाग तुटला आहे. या घटनेनंतर म्हशीं मालकाविरोधात रेल्वे पोलिसांनी रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच रेल्वे रुळांजवळ जनावरे चरण्यास घेऊन जावू नयेत, याकरीता स्थानिकांची समजूत काढण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचा अधिकाऱ्यांनी दिली आहेत.