महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे दसरा मेळावे पार पडले. यावरून दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. दसरा मेळाव्यात शिंदे गटाच्या स्टेजवर जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते. तर ठाकरे गटाच्या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू जयदीप ठाकरे उपस्थित होते. ठाकरे कुटुंबात दिवसेंदिवस दुरावतंय का अशी चर्चा सुरु आहे. एकीकडे ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य शिंदे गटाकडे जात असताना जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात का गेले? इथून पुढे कशी असेल त्यांची भूमिका काय असेल याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मी आतापर्यंत दसरा मेळाव्याला ऐकत होतो पण यावर्षी गेलो कारण आतापर्यंत ऐकत होतो पण यंदा जाऊन अनुभव घेतला. उद्धव काकांनी संधी दिली तर मी नक्की राजकारणात येईन बाकी कुटुंब कोणाला पाठिंबा देतंय याबाबत मला बोलायचं नाही मी बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उद्धव काकांच्या दसरा मेळाव्यात गेलो होतो. मोठा नातू म्हणून मी जबाबदारी पार पाडतोय असंही जयदीप म्हणलेत.
पुढे बोलताना जयदीप ठाकरे म्हणाले की, मूळ शिवसेना कोणाची हे सर्वांना माहित आहे. शिवसेनेत दोन गट पडतील असं कधीच वाटलं नव्हतं. कोरोना काळात काका स्वतः आजारी असताना त्यांनी खूप चांगल काम केलं आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे येणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.