Rain Updates ; पाऊस नेमका कधी परतणार? ; येत्या दिवसांत ‘या’ भागांना झोडपणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० ऑक्टोबर । नवरात्रोत्सवादरम्यान काहीशी उसंत घेतलेल्या पावसानं दसऱ्यापासून पुन्हा महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांत जोर धरण्यास सुरुवात केली. हवामान खात्यानं हा गैरसमज मोडीत काढत पावसाचा मुक्काम लांबल्याचं स्पष्ट केलं आहे. (imd predicts heavy imd predicts heavy rainfall in state till 14 october 2022 in state till 14 october 2022 )

(Rain Updates) पाऊस नेमका कधी परतणार? असाच प्रश्न आता बळीराजासह सर्वसामान्यांनाही पडत असताना हवामान खात्याच्या अंदाजानं अनेकांनाच झटका दिला आहे. कारण, किमान 14 ऑक्टोबरपर्तंततरी राज्यातून पाऊस काही काढता पाय घेणार नाही असंच त्यांनी सांगितलं आहे.

राज्यातील बहुतांश भागात पावसामुळं येत्या दिवसांत त्रेधातिरपीट उडणार हे नक्की. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचं सांगितल्यामुळं आता पुन्हा एकदा या सरी झोडपणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

बरं हा परतीचा पाऊस आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तसं नाहीये. कारण, राज्यात अद्याप परतीच्या पावसाची चिन्हंच नाहीत. परतीचा पाऊस या घडीला गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात आहे. उलटपक्षी (Mumbia) मुंबई, ठाणे (Thane), पालघर (Palghar), सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद इथं पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील बहुतांश भागात येणारे काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळं काही भागांमध्ये नुकसानही होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *