महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आलं असतानाही कोरोनाबाधिताची संख्या नियंत्रणात येत नसल्याने चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे राज्यात शनिवारी 36 रुग्णांचा मृत्यू झाला असून 790 एकूण नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. तसेच राज्यात आत्तापर्यंत दोन हजार रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
मुंबईत 27, पुण्यात 3, अमरावतीत 3, वसई-विरार 1, औरंगाबाद-1 मृत्यू झाला आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये 28 पुरुष तर 8 महिला आहेत. कोरोनामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 521 वर पोहोचली आहे.
दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.