महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – . राज्यात 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी कामगार दिन ही असतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यांना टोला लगावला असून, कामगारां संदर्भातही सरकारला प्रश्न विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी ‘मनसे अधिकृत’ या आपल्या ट्विटर अकाउंटवर काही ट्विट करत परखडपणे आपली भूमिका मांडली आहे.
#राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रदिन #मनसे #RajThackeray #MaharashtraDharma #maharashtraday pic.twitter.com/ZCsPlnV66H
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 2, 2020
देशात महाराष्ट्राचे महत्त्व कमी केल्याचा ठपका राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यावर ठेवला आहे. यासंदर्भात केलेल्या एका ट्विटमध्ये राज म्हणतात , ‘जवळपास सव्वाशे वर्ष मराठ्यांनी ह्या देशावर राज्य केलं, अनेक विचारधारांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अनेक द्रष्टे नेते महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, दिल्ली देखील महाराष्ट्राचं म्हणणं ऐकून घ्यायची पण आजचे राजकारणी दिल्लीश्वरांपुढे कणाहीन झालेत’, असा टोला राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना लगावला आहे.