Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या दरांमधील घसरण कायम ; पहा किती कमी झाला भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ ऑक्टोबर । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,६५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५८,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५८,९०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,८९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,९२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,९२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,६८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,९२० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५८५ रुपये आहे.

(अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *