महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । नांदेड । संजीवकुमार गायकवाड । नांदेड जिल्यातील सर्व तालुक्यातील नदी, नाले, होळ, यातून रात्रभर रेतीचा बेसुमार उपशा होत असून नव्यानेच रुजू झालेले जिल्हाअधीकारी मा. विपीन ईटनकर यांनी पदभार घेताच कोणाचेही दादागिरी सहन केली जाणार नाही. मात्र जिल्ह्यात बिलोली, धर्माबाद, कुंडलवाडी, नायगाव, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, या ठिकाणी दररोज रात्री ट्रॅक्टर, टिपर, आदी साधने वापरून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून बेसुमार रेेेती उपसा केली जात आहे. तर या चोरांना चक्क पोलीसांचाच आशीर्वाद असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. अशा पोलिसांवर कारवाई करावी, अशीही आग्रही मागणी होत आहे.
सून घरकुल योजनेच्या लाभार्त्यानी घर बांधकाम करण्यासाठीसाठी वाळू मिळत नाही. प्रशासन आणू देत नाही म्हणून सामान्य मानसच्या गरजा किती रेती नसल्या मुळे घरकुल बंधने मागी राहिला आहे. बांधल्या शिवाय दुसरा तिसरा हप्ता भेटत नाहीइकडे कोरोनाने हाताला काम नाही तिकडे घरबांधकाम करून हातचे पैशे अडकून पडले आहेत पण देशात लॉकडाऊन असूनही जागोजागी पोलीस यंत्रने ची सुरक्षा नाकेबंदी असतानाही वरील शहरात रातोरात जागोजागी रेती चे ढीग पहावयास मिळत आहेत प्रशासनास सांगूनही त्याच्या कडून कोणतीच कार्रवाही होताना दिसत नाही काही ठिकाणी तर महसूल व पोलीस अधिकारी यांच्या जवळीळ नातेवाईकच रेतीचा बेसुमार उपसा करून दीड ब्रास रेतीला 15000 रुपये घेत आहेत. त्यातल्या त्यात स्थानिक गुन्हे शाखेत रेतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमण्यात आले असूनही नांदेड जिल्याची संजीवनी गोदावरी नदीतुन वाजरा नंदीतुन नायगावतालुकयातील कहाळ(खु )येथील होळातून, किनवटच्या पैनगंगा मधून ओव्हरलोड रेती वाहतूक रोजरोजस पणे कोणाच्या परवानगीने होत आहे वाळू तस्कर या फुकटच्या कमाईतून गब्बर झाले आहेत नांदेड जिल्यातील सर्व पोलीस व महसूलचे वरिष्ठ अधीकारी हे कोरोनाचा वायरस नांदेड जिल्यात पसरू नये म्हणून अहोरात्र झटत आहेत. परंत पोलीस खात्यातील काही कर्मचारीच्या मूकसंमती ने वाळू माफिया अवैध मार्गाने रेतीची तस्करी आपली तोम्डी भरत आहेत वरिष्ठांनी वेळीच याकडे लक्ष देऊन वाळू चोरांच्या मुसक्या आवळवेत व राज्याशासनाच्या महसुलात भर घालावी. अशी मागणी नागरीकातून होत आहे. तर अवैध धंदयांना पाठबळ देणाऱ्या पोलीस निरीक्षकाची बदली करण्यानाची मागणी नागरिकांमधून होत आहे.