Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
कोरोना अलर्ट : बुलडाणा जिल्हयात आज प्राप्त ५२ कोरोना अहवाल 'निगेटिव्ह - Maharashtra 24

कोरोना अलर्ट : बुलडाणा जिल्हयात आज प्राप्त ५२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – बुलडाणा – गणेश भड : बुलडाणा जिल्ह्यात आज प्राप्त ५२ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ४९६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे. तसेच आतापर्यंत १९ कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या १९ असून सध्या रूग्णालयात ४ रूग्ण उपचार घेत आहेत.

तसेच आज २ मे रोजी ५२ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ५२ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने २४ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ४ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ४९६ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *