महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ ऑक्टोबर । अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, पिंपरी चिंचवड महानगर कार्यकारिणीच्या वतीने, महात्मा जोतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे हे १५० वे वर्ष आहे, त्यानिमित्ताने सत्यशोधक समाजाचे कार्य अविरत चालवणाऱ्या मानवजी कांबळे, मारुती भापकर, सुप्रियाताई सोळंकुरे, शारदाताई मुंडे, रघुनाथ ढोक, आनंदा कुदळे, वसंतनाना लोंढे या मान्यवरांचा गुरुवार, दि- २० ऑक्टोबर २०२२ रोजी ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर- चिंचवड येथे कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास गारुडकर साहेब (उपाध्यक्ष- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद-महाराष्ट्र) मंजिरीताई घाडगे (अध्यक्षा- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद- महाराष्ट्र) रवीभाऊ सोनवणे (सचिव- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद) प्रितेश गवळी (विभागीय अध्यक्ष- पुणे) यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, पिंपरी-चिंचवड महानगर कार्यकारिणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर राहुलदादा जाधव, माजी सभापती- स्थायी समिती संतोषआण्णा लोंढे, माजी महापौर डॉ. अनिताताई फरांदे, माजी सभापती पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळ विजय लोखंडे, माजी सभापती पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळ चेतनभाऊ भुजबळ, माजी नगरसेवक सतीशदादा दरेकर, नगरसेविका सुवर्णाताई बुर्डे, नगरसेविका रेखाताई दर्शिले, माजी नगरसेविका सुरेखाताई बोरुडे, माजी नगरसेवक घनश्यामतात्या खेडकर, माजी नगरसेवक सुरेशतात्या म्हेत्रे, वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष देवेंद्र तायडे, पोलीस अधिकारी गणेश रायकर साहेब, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस महिला महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, पिंपरी-चिंचवड साळी समाज अध्यक्ष विष्णुपंत निचळ, माळी महासंघाचे विश्वस्त काळूरामआण्णा गायकवाड, महात्मा फुले मंडळ-चिंचवड अध्यक्ष हनुमंत माळी, खान्देश माळी मंडळाचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ माळी, नगरसेवक प्रकाशभाऊ भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते योगेशभाऊ लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विजय दर्शले, सामाजिक कार्यकर्ते हिरामण भुजबळ हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ,….परिषदेचे शहर कार्याध्यक्ष श्री. पि. के. महाजन यांनी प्रास्ताविक केले, आभार महिला कार्याध्यक्षा कविताताई खराडे आणि सूत्रसंचालन नकुल महाजन यांनी केले. यावेळी महिला अध्यक्षा वंदनाताई जाधव, सरचिटणीस राजेंद्र करपे, वरिष्ठ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोंढे, महिला उपाध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष- ईश्वर कुदळे, सदस्या अरुणाताई माळी हे उपस्थित होते.