संजय राऊत यांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार ; दिवाळीसुद्धा जेलमध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ ऑक्टोबर । शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्यात (patra chawl scam) ईडीने (ED) मनी लाँड्रिंगप्रकरणी (money laundering) संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक केली आहे. संजय राऊत यांनी जामिनासाठी (Bail) केलेल्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

कोर्टाने संजय राऊत यांच्या कोठडीत 13 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना ईडीने शुक्रवारी विशेष न्यायालयात (PMLA) न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली.

ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. हे प्रकरण अत्यंत क्लिष्ट असल्यानं आम्हाला याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे, असं कोर्टाने म्हटलं. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *