महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ ऑक्टोबर । मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाटात मोठी वाहतूककोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झाली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवार सुट्ट्या यामुळे या महामार्गावर ही वाजतूक कोंडी झाली आहे. दीड ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
तसेच पुणे सातारा महामार्गावर मोठ्या वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. या मार्गावर एक कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली आहे.