महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ ऑक्टोबर । अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांत झालेल्या घसरणीची धग परदेशात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या खिशापर्यंत पोहोचली आहे. यंदाच्या वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरले गेले असले तरी, रोजचे खर्च आणि पुढील वर्षाचे शैक्षणिक शुल्क याकरिता मोठा भार पडणार आहे.
जुलैमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत ही ७९ रुपये होती. मात्र, अवघ्या साडेतीन महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ वर पोहोचला आहे. याचा अर्थ अवघ्या साडेतीन महिन्यांत एका डॉलरमागे किमान ४ रुपयांनी खर्च वाढला आहे.
चलनवाढ सर्वोच्च पातळीवर अर्थतज्ज्ञ एम. राजेश्वरन यांनी सांगितले की, अमेरिकेत सध्या चलनवाढ सर्वोच्च पातळीवर आहे. तेथील मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. परिणामी, अनेक गुंतवणूकदार अमेरिकेत जात आहेत. त्यामुळे डॉलर महाग होत चालला आहे.