महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ ऑक्टोबर । भावा-बहिणीच्या नात्याचं प्रतिक असलेला हा सण कार्तिक मास शुक्ल पक्ष द्वितीय तिथीला साजरी केली जाते. रक्षा बंधनासारखं हा सण फार महत्वाचा असतो. भावाला ओवाळताना त्याच्या दीर्घायुष्याची कामना केली जाते. यावेळी शास्त्रांनुसार भावाला ओवाळताना काही गोष्टी म्हणने आवश्यक असते.
पौराणिक मान्यतांनुसार बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यावेळी ह्या ओळी म्हणाव्या. लाल करदोडा गुंडाळून श्रीफळ, पान सुपारी भावाच्या हातात द्यावे.
काय म्हणावं?
अळी बळी जाऊदे
बळीचं राज येऊ दे
कोट दसरे कोट दिवाळे,
हिरे माणिक ओवाळी
रामाचं राज्य करा!