Vinayak Nimhan : माजी आमदार विनायक निम्हण यांना अखेरचा निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ ऑक्टोबर । माजी आमदार व उद्योगपती विनायक निम्हण यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील पाषाण गावच्या स्मशानभूमीत रात्री सव्वा दहा वाजता अंत्यसंस्कार झाले. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

‘विनायकराव निम्हण हे सर्वांचे लाडके आबा होते. एखादी व्यक्ती किती सकारात्मक असावा याचे मोठे उदाहरण होते. लहान मोठ्यांसाठी कोणते ही काम असले तरी नाही न म्हणता, आपल्याला जमेल तेवढे करणारे होते. विनायकराव यांचे शहराच्या विकासात मोलाचे योगदान होते. ही दुःख द बातमी सर्वांना न आवडणारी आहे. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो’ अशी भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

माजी आमदार निम्हण यांची अंत्ययात्रा झुंज बंगला येथून आठ वाजता निघाली. नागरिकांनी घराबाहेर येऊन त्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अंत्ययात्रा सव्वा नऊ वाजता स्मशानभूमीत पोचली. सव्वा दहा वाजता मुलगा सनी याने अग्नी दिला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, रमेश बागवे, माजी मंत्री प्रकाश देवळे,खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अतुल बेनके, आमदार माणिक कोकाटे, माजी आमदार शरद ढमाले, दीपक पायगुडे,युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,पालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, महसूल विभागाच्या तहसीलदार तृप्ती कोलते, तलाठी संतोष चोपदार हजर होते.

माजी महापौर, मुरलीधर मोहोळ, दत्तात्रेय धनकवडे,मनसेचे वसंत मोरे, राजेंद्र खेडेकर, श्रीनाथ भिमाले, सुशील मेंगडे, मंजुश्री खर्डेकर, मनीष आनंद, ज्ञानेश्वर तापकीर, डॉ.दिलीप मुरकुटे, राहुल कलाटे, दत्ता बहिरट, अरविंद शिंदे, अविनाश साळवे, राजू पवार, रजनी त्रीभुवन, नीलेश निकम,

माजी महापौर दत्ता गायकवाड, दीपक मानकर, मुकारी आलगुडे, विनोद ओरसे, दत्ता सगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदीप गारटकर, प्रकाश ढोरे, मनसेचे बाबू वागस्कर, अजय शिंदे,भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, काँग्रेसचे संजय बालगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मते, स्वाती ढमाले, रवींद्र साळगावकर, राजेंद्र गोरडे, मुळशीचे गणपत वाशिवले, दिलीप गायकवाड, भरत कुंभारकर,बाळासाहेब अमराळे, अमोल बालवडकर,भाजप शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, विकास पासलकर, गजानन थरकूडे, अविनाश बलकवडे, राजू चव्हाण, दीपक शेडे यांच्यासह अनेक मान्यवर व पाषाणचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *