दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अफलातून मागणी ; नोटांवर ……… तर अर्थव्यवस्था सुधारेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ ऑक्टोबर । भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो छापा, अशी अफलातून मागणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली. असे केले येईल, असा दावा त्यांनी केला.

ही मागणी म्हणजे गुजरात निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याचे मानले जात आहे. ‘लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते, तर गणपती विघ्नहर्ता आहे. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही. किमान नवीन नोटांवर ही सुरुवात तर भारतीय अर्थव्यवस्था रूळावर केली जाऊ शकते, असे केजरीवाल म्हणाले. इंडोनेशियात ८५ टक्के मुस्लीम आणि केवळ दोन टक्के हिंदू आहेत. मुस्लीम राष्ट्र असूनही तिथल्या नोटांवर गणपतीचे छायाचित्र आहे.

या मागणीच्या पृष्ट्यर्थ केजरीवाल यांनी दिली. भारताला विकसित आणि समृद्ध देश म्हणून ओळख मिळवावी अशी देशवासीयांची इच्छा आहे. परंतु, आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक टप्प्यावर आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले.

मग डॉ. आंबेडकर यांचा फोटो का नाही?
केजरीवाल हे धर्माची नशा विकण्याचं काम करीत आहेत. त्यांच्यात व मोदींमध्ये फारसा फरक नाही. चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नाही? -नितीन राऊत, काँग्रेस नेते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *