रेशन कार्ड ; या एका चुकीने नागरिक त्रस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । आता अनेक ठिकाणी रांगा लावण्यापेक्षा रेशन घेताना अनेकांनी बायोमेट्रिक (Biometric) प्रणालीद्वारे रेशनिंगमार्फत वस्तू घेण्यास सुरूवात केली आहे. बायोमेट्रीक तंत्रज्ञानामुळे आता सगळंच सोयीस्कर झालं आहे. परंतु अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे कधीकधी लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या अशाच एक प्रकार समोर आला आहे. सर्वर डाऊन असल्याने बायोमेट्रिक प्रणालीत बिघाड झाला आणि त्यामुळे अनेकांना रेशन मिळेनासे झाले. (due to server down in biometric system ration cardholders suffers problems)

पुणे जिल्ह्याच्या सणसवाडी येथील सरकारमान्य स्वस्त धान्य वितरण दुकानात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे वितरक आणि नागरिकांमध्ये वाद पहिला मिळाला आहे. नागरिकांचे बायोमॅट्रिक दोन तीन वेळा करावा लागत आहे.

त्यामध्ये बायोमॅट्रिक सर्व्हर डाउन (Server Down) असल्यामुळे नागरिकांना धान्य असून सुद्धा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे उन्हातान्हात त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या या डिसाळ कारभारमुळे महिन्याचं धान्य आणि दिवाळीचा आनंदाच्या शिधा पासून वंचित राहावे लागत आहे.

बायोमेट्रिक सर्व्हरमुळे अनेकांना आता भर दुपारी उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून हे तंत्रज्ञान होते. परंतु तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. रेशनकार्डवर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींनी आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासबुक झेरॉक्स अशी कागदपत्रे धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील धान्य मागणीचा अर्ज भरून ते वितरणाकडे सादर केल्यावर तुमच्या कुटुंबाला स्वस्त धान्य मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *