ठाकरे-शिंदेंच्या ‘फायरब्रँड तोफा’ आमनेसामने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ नोव्हेंबर । पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) विरुद्ध शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यात जोरदार शाब्दिक लढाई सुरू झाली आहे. महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात सुषमा अंधारे नावाचा झंझावात जळगावात (Jalgaon) पोहोचलाय. जळगावचे तब्बल 5 आमदार ठाकरे गटातून (Thackeray Group) फुटून शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले. त्यामुळं सुषमा अंधारेंनी हल्लाबोल करण्याआधी गुलाबरावांनीच पहिला वार केला. अंधारे म्हणजे ठाकरे गटातलं जेमतेम 3 महिन्यांचं बाळ आहे, असं गुलाबराव म्हणाले.

सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर
गुलाबराव पाटील यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी आपल्या स्टाईलमध्ये करारा जबाब दिला. मी जर तीन महिन्यांचं बाळ असेल तर बाळ केस ओढतं, बाळ आपल्या मोठ्या भावाच्या गालाव चापट्या मारतं, बाळ लाथा झाडतं, कारण बाळाला काहीही करायचा अधिकार आहे, असं सांगत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना आवाहन दिलं आहे.

अंधारे बाईंनी हिंदू धर्मावर आणि ठाकरे कुटुंबावर केलेल्या जहरी टीकेची आठवण गुलाबरावांनी यावेळी करून दिली, हिंदू देवतांवर या बाई किती भयाणक बोलल्या आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी काय काय बोललं आहे. बाळासाहेबांवर काय बोलल्या आहेत, हिंदू धर्मावर काय बोलल्या आहेत. याच्याही क्लिप दाखवाव्यात, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.

त्यावर टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटला. पण सत्तेचा मलिदा खाऊनही तुमचं काळीज एवढं निगरगट्ट का झालं, असा जळजळीत सवाल अंधारेंनी गुलाबरावांना केला. हे कमी झालं म्हणून की काय, गुलाबरावांनी चिल्लरचाळे करू नयेत, असा सल्लाही त्यांनी लगे हात देऊन टाकला..

पाणीपुरवठामंत्री असूनही धरणगाव शहराला कमी पाणीपुरवठा होत असल्यानं गुलाबराव सध्या टीकेचे धनी बनलेत. त्यात ते राष्ट्रवादीला मदत करत असल्याचा आरोप आमदार चिमणराव पाटलांनी केलाय. मंत्रिपदासाठी किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील या जळगावातल्या दोन आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय.. त्यात आता सुषमा अंधारेंच्या तोफगोळ्यांचा सामना करताना गुलाबरावांची चांगलीच दमछाक होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *