महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । नाशिक । टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोची आवक वाढल्यानं भाव ८० रुपयांवरून थेट २५ ते ३० रुपयांपर्यंत खाली आलेत. त्यात निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे दहा दिवसांत भाव जवळपास निम्म्यावर आलेत. टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.