विम्यासाठी भरले ८० रु., भरपाई मिळाली ५ रु.; शेतकरी कोर्टात जाणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । अस्तगाव (जि. अहमदनगर) । प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत राहाता तालुक्यातील केलवड येथील बाबूराव सावळेराम गमे या शेतकऱ्याला एका गुंठ्यामागे ५.३८ रुपयाने रक्कम खात्यात जमा झाली.

विमा काढताना कंपनीने शेतकरी व केंद्र तसेच राज्य सरकारकडून ८० रुपये १६ पैसे गुंठ्याने रक्कम जमा केली. असाच प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला. सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले कंपनीने शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे.

अनेक गावांत शेतकऱ्यांकडून विमा कंपनीने प्रतिगुंठा ५, ३८, ४३, ५६, ७०, ९०, १०० ते १३० अशी सरासरी रक्कम जमा केली. अतिपावसाने पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असताना केवळ नगण्य रक्कम का दिली, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

मदतीची अपेक्षा, परंतु भ्रमनिरास

एका गुंठ्यामागे शेतकऱ्यांकडून ११ रु. ४५ पैसे व सरकारकडून ६८ रु. ७१ पैसे भरलेले असतात. केलवडचे शेतकरी बाबूराव सावळेराम गमे यांनी २ हेक्टर ६१ आरवर विमा उतरविला होता, १०० टक्के नुकसान होऊनही त्यांना फक्त १,४०६ रु. खात्यात वर्ग केल्यामुळे शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *