महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ नोव्हेंबर । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2 रुपयांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आता पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी गेल्या 24 तासांत शहरांमध्ये इंधनाच्या किमतीत फारसा चढउतार दिसून आला नाही. बुधवार सकाळपासून शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज जारी केलेल्या दरामध्ये फारसा बदल झालेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. याचा परिणाम देशातील इंधन विक्रीवर होण्याची शक्यता आहे. गुजरात आणि हिमाचल राज्यातील निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका देखील येत्या काळात जाहीर होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होऊ शकते.
पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर \ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
दिल्ली- पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर \ डिझेल 89.07 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर \ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर \ डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर