महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ नोव्हेंबर । गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या 135वर गेली आहे. देशभरात खळबळ माजविणाऱ्या या अपघातप्रकरणी ओरेव्हा कंपनीचे दोन मॅनेजर आणि दोन बुकिंग क्लार्कसह नऊ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यातील दीपक पारेख नावाच्या एका मॅनेजरने न्यायालयात या दुर्घटनेची सगळी जबाबदारी देवावर ढकलून दिली. पारेख याला अन्य आरोपींसह बुधवारी न्यायदंडाधिकारी एम.जे.खान यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी पारेख याने न्यायालयात म्हटलं ही दुर्घटना ‘देवाच्या मनात आल्याने झाली’
कोलकाता येथे 2016 मध्ये असाच पूल कोसळला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ही दुर्घटना झाली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कशी टीका केली होती? याचा व्हिडिओ मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आता गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. पंतप्रधान मोदी काय बोलणार? असा सवाल सोशल मिडियावर विचारला जाऊ लागला आहे.