महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती सोमवारी 31 ऑक्टोबरला समोर आली होती. यानंतर पुढील तीन दिवस शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले. यानंतर आज 2 नोव्हेंबरला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे या हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत.
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानतर राष्ट्रवादीने ट्विट करत याबाबतच माहिती दिली होती. त्यांनी त्यांनी असे म्हटले होते की, 2 नोव्हेंबरला संध्याकाळी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर 3 तारखेला शरद पवार हे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. 4 ते 5 नोव्हेंबर रोजी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी करू नये, अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधीही मागील वर्षी मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास झाला होता. शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.