महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । भाषणे देण्यासाठी आम्ही जमलो नाही. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या खासदारकी, कोण मोजत नाही. मी मरताना ते आमदार पद लागणार नाही. मी मरताना एक हिंदू मेला असे लोक सांगतील.हिंदूला वाकड्या नजरेने पाहिले तर मी बघून घेईल, नुसत्या धमक्या मी देणार नाही. माझे नाव ठाकरे नाही, राणे आहे. असे कार्यक्रम करेल की, लक्षात ठेवावे लागेल असा इशारा नीतेश राणे यांनी आज कोल्हापुरात दिला.
नीतेश राणे म्हणाले, दोन मुली पळून गेल्या. मी दोन तास पोलिसांसोबत बसलो. त्यानंतर लगेचच मुली परत आल्या. अर्थात पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. हप्ते जोपर्यंत बंद होणार नाही. तोपर्यंत तत्काळ कारवाया होणार नाही. आमच्याकडे सर्व माहिती आहे. कुणालाच सोडणार नाही. तुम्ही चिंता करू नका. सर्व कार्यक्रम सांगून करायचे नसतात. नंतर समजेलच की, मी भाषणात काय बोलत होतो.
नीतेश राणे म्हणाले, आपल्याला टोप्या घालाव्या लागतात. गमछे घालावे लागतात. घोषणा द्याव्या लागतात. आपल्याला किरण पावसकर, नीतेश राणे लागतात. मगच आपण काहीतरी करतो आणि मगच आपण काहीतरी करतो. हीच आपली शोकांतिका आहे. हिंदू कमी होता कामा नये. शास्त्र आणि शस्त्र कधी वापरायचे हे हिंदू धर्मियांना चांगलेच माहित आहे.
आपल्या मुलींना पळून जायला मदत करणारे आपलेच नालायक लोक आहेत. कुठल्याही हिंदूला वाकड्या नजरेने पाहिले तर मी बघून घेईल. नुसत्या धमक्या मी देणार नाही माझे नाव ठाकरे नाही, राणे आहे. असे कार्यक्रम करेल की, लक्षात ठेवावे लागेल.
नीतेश राणे म्हणाले, तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसे सुखरूप घरी पाठवायचे मी पाहून घेईल याबाबत मी तुम्हाला शब्द देतो. महाराष्ट्रात कशाला योगी पॅटर्न हवा, फडणवीस आहेत ना. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा. एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत. त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणं गरजेचे आहे.