राऊतांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला, दिलासा मिळण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत मुंबईच्या पीएमएलएने कोर्टाने 14 दिवसांची वाढ केली आहे. आता पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला रोजी होणार आहे.

गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी राऊत यांना अटक केलीय. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी 2 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. आता या कोठडीत पुन्हा वाढ झालीय. राऊत यांना आतापर्यंत दोनदा न्यायालयीन कोठडी मिळालीय. हे पाहता त्यांच्या जामिनाचा मार्ग सुकर झालाय.

नेमके प्रकरण काय?

गोरेगावमध्ये गुरू आशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यावेळी प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर आहे.

मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 12 वर्षांपूर्वी 50 लाख जमा करण्यात आले होते. हे पैसे राऊत यांनी पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे अलिबागमधील एकूण 8 प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. गोरेगाव झोपडपट्टी प्रकरणी प्रवीण राऊत यांची जवळपास 72 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यांनतर आता संजय राऊतांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *