राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार? मनसे विरुद्ध ब्रिजभूषण सिंह असा सामना ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) येत्या काही दिवसात महाराष्ट्रात (Maharashtra) येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं (Maharashtra Kesari) आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धांना ब्रिजभूषण सिंह उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे मनसे विरुद्ध ब्रिजभूषण सिंह असा सामना आता रंगू शकतो.

ब्रिजभूषण यांनी केला होता विरोध
मे 2022 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा (Ayodhya Visit) आयोजित केला होता. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात जे आंदोलन केलं होतं, त्याबाबत जोपर्यंत समस्त उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही अशी भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती. राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते अयोध्येत आलेच तर परत जाऊ शकणार नाहीत, असं थेट आव्हानच ब्रिजभूषण सिंह यांनी दिलं होतं.

ब्रिजभूषण महाराष्ट्रात येणार
दरम्यान, राज्यात भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिजबूषण सिंह महाराष्ट्रात आले तर मनसेची भूमिका काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्रिजभूषण सिंह हे गेल्या 10 वर्षांपासून कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. तसंच ते स्वत: पैलवान राहिले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *