महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दिल्लीमध्ये आले आहेत. दिल्लीमध्ये किरीट सोमय्या यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या बैठकींनंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
केंद्र सरकारला आपण 12 घोटाळ्यांच्या संदर्भातील फुल प्रूफ डॉक्युमेंट पुरावे म्हणून सादर केले आहेत. कॅग ऑडिट लवकरात लवकर सुरू होईल, अशी आशा मला आहे. जवळपास 25 हजार कोटींचा हा घोटाळा असून लवकरच याचा पर्दाफाश होईल, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान 12 वर्ष जुन्या पेण अर्बन बँकेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. जो पैसा डिपॉझिटच्या माध्यमातून मिळेल तो सर्व खातेदारांना देण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
सोमय्यांचे पेडणेकरांवर आरोप
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली, त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा पेडणेकरांवर आरोप केले.
किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी केली गेली. खोटे काही केले नाही तर मग कुलूप घेवून दुकाने घरं, बंद करायला निघाला आहात. तर मग चौकशीला समोरे का जात नाही, असा सवाल सोमय्यांनी केला.
पुढच्या चार दिवसात मी किशोरी पेडणेकरांच्या मुलाचे परदेशात काय उद्योग आहे. हे सांगणार आहे. हे प्रकरण खूप मोठे आहे. मोबाईलचा सीडीआर आहे. त्या का घाबरत आहेत. आणखी अशा चार एसआरएमध्ये त्यांनी घोटाळे केले आहेत, असा आरोपही सोमय्यांनी केला.
निर्मल नगर पोलीस, मुख्यमंत्री कार्यालय सगळीकडे मी पुरावे दिले होते पण त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दबाव आणला होता. सहा ठिकाणी किशोरीताईच्या विरोधात चौकशी चालू आहे. त्यात कंपनी मंत्रालय, मुंबई ॲाफेन्स विंगने तपास करावा, अशी माझी मागणी आहे, असंही सोमय्या म्हणाले.
‘संजय अंधारी याला एसआरएचा फ्लॅट मिळाला. त्याला एसआरए फ्लॅट दिला. किशोरी पेडणेकर आणि क्रीश कॅार्पोरेटने कंपनी मंत्रालयाली लिव्ह लासन्ससवर दिला. या दोन्ही सह्या वेगवेगळ्या आहेत. त्यात जमीन आसमानचे अंतर आहे. यातला खरा संजय अंधारी कोण आहे. हे खरं शोधून काढा, अशी मागणीही सोमय्यांनी केली होती.
किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर त्यांचा भाऊ सुनिल कदम आहे. हे मी नाही सांगत आहे तर या स्वत: सांगत आहे. सुनिल कदम कोविड काळात गेला आहे. या नौटंकी करत आहे. मृत भावाला अशी भाऊबीज देत आहात? मीडियाला सांगता किरिट सोमय्या तर माझा भाऊ आहे. लाज वाटली पाहिजे की, तुम्ही अशा पद्धतीने आपल्या मृत भावाच्या नावे घोळ करता, अशी टीकाही सोमय्यांनी केली.