Ravindra Jadeja बाहेर पडणार? CSK च्या सीईओने केला खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । क्रिकेट जगतात सध्या टी २० विश्वचषकाचा फिव्हर पाहायला मिळत आहेत. यानंतर आयपीएलचा थरार रंगणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या विश्वातून महत्त्वाच्या अपडेट्स समोर आहेत. १० फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाला त्यांचे काही खेळाडू करारमुक्त करायचे असतील, तर त्यांची यादी सादर करण्यासाठी केवळा १५ दिवस उरले आहेत. अशातच सीएसकेला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. (IPL 2023 IS Ravindra Jadeja Will Not Play For Chennai Super Kings Next Year Kasi Viswanathan)

जडेजाला करारमुक्त करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. जडेजा पुढील हंगामात चेन्नईकडून खेळणार नसल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. त्याचबरोबर तो संघासोबतच राहणार असल्याचेही काही जण सांगत आहेत. दरम्यान, एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी जडेजाला करारमुक्त करण्याचे वृत्त फेटाळून लावले.

काशी विश्वनाथन काय म्हणाले?

जडेजा हा संघातील महत्त्वाचा सदस्य असून तो फ्रँचायझीसोबत असेल. रवींद्र जडेजाबाबत मीडियामध्ये येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत.’ गेल्या सीझनमध्ये जडेजाला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. आठ सामन्यांमध्ये संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा संघाची कमान सोपवण्यात आली. तो या सीझनमध्येही कर्णधार असेल. अशी माहिती विश्वनाथन यांनी दिली.

तसेच, जडेजा चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचा महत्त्वाचा सदस्य आहे. फ्रँचायझी जाडेजाची हकालपट्टी करण्याचा विचारही करू शकत नाही. तो ट्रेंडिग आहे. जडेजाला आम्ही संघात ठेवू. अशा ठाम शब्दात विश्वनाथन यांनी जडेजा संघातून बाहेर पडण्याच्या चर्चेला पुर्णविराम दिला.

आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मिनी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. याआधी, १० फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाला त्यांचे काही खेळाडू करारमुक्त करायचे असतील, तर त्यांची यादी सादर करावी लागणार आहे. ही यादी सादर करण्याच्या अंतिम तारखेला सुमारे १५ दिवस उरले आहेत. या आधीही अनेक संघ आपल्या काही बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *