फडणवीस हुशार त्यांनी काँग्रेसचे २२ आमदारही तयार ठेवलेत, शिवसेना नेत्याचा मोठा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ नोव्हेंबर । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी आता गौप्यस्फोट केला आहे. हे सरकार पडणार म्हणून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा मोठा दावा खैरे यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
सॅलरी डेजमध्ये 1 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत अप्लायन्सेसवरील सर्वोत्तम डील शोधा, सॅमसंग, LG, लॉयड आणि इतर अनेक ब्रँड्सवर 40% पर्यंत सूट मिळवा!

राज्यातील २२ नाराज आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. हे २२ आमदार कुठले आणि कोण आहेत? हे मात्र चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं नाही. पण काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते सध्या शांत आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे. यामुळे ठाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पराभव होईल. छगन भुजबळ, नारायण राणे पडले. मग एकनाथ शिंदेही निवडणुकीत पडणार. फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर शिंदे गटातील सर्वचे सर्व ४० आमदारांचा पराभव होईल, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

सिल्लोडमध्ये आमची खूप ताकद आहे. हा सत्तार आमच्या ताकदीने निवडून आला. साहेबांना हात जोडले. तुम्ही खैरे साहेबांना सोबत घेऊन चला, असे म्हणत साहेबांना त्याने हात जोडले. त्यानंतर साहेबांनी दोघांचे हात धरून वर केले आणि सांगितलं निवडून आणायचं. आणि लोकांनी मतदान केलं तसं. हे मान्य केलं त्याने त्यावेळीस. नंतर आता कुठे मान्य करतो तो. सत्तार सरडा आहे, सगळीकडे फिरतो, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी बोचरी टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *