अल्टोपेक्षाही स्वस्त इलेक्ट्रिक कार 16 नोव्हेंबरला होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ नोव्हेंबर । वाढत्या इंधनाच्या दरांमुळे वैतागलेले अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे वळत आहेत. मात्र, किमतींचा विचार करता सर्वांनाच सध्या या गाड्या खरेदी करणे शक्य नाही.मात्र, येत्या १६ नोव्हेंबर रोजी अल्टो कारच्या किमतीपेक्षाही देशातील सर्वात इलेक्ट्रिक कार लाँच केली जाणार आहे. मुंबईतील सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप पीएमव्ही इलेक्ट्रिक येत्या 16 नोव्हेंबरला मायक्रो-इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे.

पीएमव्हीने या गाडीला EaS-E असे नाव दिले आहे. नागरिकांनी या गाडीचा वापर दैनंदिन करावा अशी कंपनीची इच्छा आहे. PMV ला इलेक्ट्रिक पर्सनल मोबिलिटी व्हेईकल नावाचा पूर्णपणे नवीन विभाग तयार करायचा आहे. १६ नोव्होंबर रोजा लाँत होणाऱ्या EAS-E इलेक्ट्रिक कारची किंमत 4 लाख ते 5 लाख रुपये असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अवघ्या ४ तासात फुल्ल चार्ज होणार कार

PMV EaS-E तीन व्हेरिएंटमध्ये सादर केली जाणार आहे. फुल्ल चार्ज केल्यानंतर या कारची ड्रायव्हिंग रेंज 120 किमी ते 200 किमीपर्यंत बदलते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीची बॅटरी अवघ्या ४ तासांत फुल्ल चार्ज होईल, असा दावा पीएमव्हीने केला आहे.

शहरातील गर्दीत सहज येणार चालवता

लाँच होणाऱ्या या मायक्रो इलेक्ट्रिक कारची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी तर, उंची 1,600 मिमी इतकी आहे. याचा व्हीलबेस 2,087 मिमी असेल, तर ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी असेल. आकाराने ही कार अगदी छोटी अशल्याने ती शहरातील गर्दीत अगदी सहजपणे चालवता येणार आहे. तसेच लहान आकारामुळे पार्क करणेदेखील सोपे असणार आहे.

असे आहेत फीचर्स

या कारमध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, USB चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि सीट बेल्ट यांसारखी फीचर्स दिली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *