महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ नोव्हेंबर । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक नेते पक्षांतर करत होते. नेते फोडाफोडीच राजकारण सुरू झालं. अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. जर शिंदे गटाचे आमदार कोर्टाने बाद ठरवले तर फडणवीसांनी पुढचा प्लॅन तयार असल्याचंही खैरे म्हणाले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा बॉम्ब उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला आहे.
शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. यावेळी त्यांनी हा धक्कादायक दावाही केला. यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही, उलट महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे. 170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे.
पुढे ते म्हणाले की, महाविकास आघडीत काय आलबेल आहे ते आज पुढे आले. सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो त्यावेळी खोके घेतले होते का? असा उलट प्रश्नही उदय सामंत यांनी केला आहे.