भंगाराच्या दुकानात चक्क गांजाची लागवड, सातारा गुन्हे शाखेकडून छापा; सव्वापाच लाखांचा गांजा जप्त

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ नोव्हेंबर । सातारा शहरालगत असलेल्या वाढेफाटा येथील भंगाराच्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून त्या ठिकाणी लागवड केलेली 5 लाख 22 हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. परशुराम रामफेर ठाकूर (वय 35, रा. 125, रघुनाथपुरा, करंजे, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सातारचे जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी जिल्ह्यात अमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात कारवाया करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देककर यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने देककर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केलेले आहे. काढेफाटा येथे एका भंगाराच्या दुकानात एका इसमाने गांजाच्या झाडांची लागवड करून जोपासना केल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांना मिळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने काढेफाटा येथील जय दुर्गामाता क्रॅप मर्चंट या दुकानामध्ये छापा टाकून दुकानाच्या परिसरात लागवड करून जोपासना केलेली गांजाची 5 लाख 22 हजार रुपये किमतीची झाडे जप्त करून गुन्हा दाखल केला.

पोलीस निरीक्षक अरुण देककर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, किजय कांबळे, प्रकीण फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, किक्रम पिसाळ, गणेश कापरे, किशाल पवार, पृथ्वीराज जाधव, चालक संभाजी साळुंखे, फॉरेन्सिक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राजू कुंभार व अमोल जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *