EWS Quota Verdict : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आर्थिक दुर्बलांना दिलासा मिळेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ नोव्हेंबर । आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (EWS) आरक्षण वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आज निकाल दिला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व जाती धर्मांतील गरीब आणि दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाचा निर्णय मैलाचा दगड असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय वैध ठरवला. या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो. यामुळे सर्व जाती धर्मांतील गरीब आणि दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळेल. न्यायालयाचा हा निर्णय गोरगरीबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिलेले आर्थिक आरक्षण कोर्टात वैध ठरले आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मैलाचा दगड आहे. या आर्थिक आरक्षणाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल. मराठा आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजालाही हे आरक्षण लागू असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *