महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ नोव्हेंबर । कार्तिक पौर्णिमा आज मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी चंद्रग्रहणही होत आहे. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचे स्नान, दान, व्रत आणि पूजा चंद्रग्रहणाच्या दिवशी कशी होणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. चंद्रग्रहणामुळे पौर्णिमेच्या कार्यांवर काहीसा परिणाम दिसणार आहे, कारण अशा वेळी शुभ कार्ये वर्ज्य असतात. पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊया. तसेच कार्तिक पौर्णिमेच्या स्नान-दानाची वेळ काय असेल? तेही पाहु या.
कार्तिक पौर्णिमा 2022
हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा सोमवार, 07 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:15 पासून सुरू झाली आहे. ती मंगळवार, 08 नोव्हेंबर रोजी दुपारी 04:31 पर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या आधारे कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबरला आहे. या दिवशी स्नान आणि कार्तिक पौर्णिमेचे व्रत असेल.
कार्तिक पौर्णिमा 2022 स्नान-दान मुहूर्त
कार्तिक पौर्णिमेला स्नान व दानधर्म सकाळच्या मुहूर्तावर केला जातो. अशा स्थितीत तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 05:06 ते 05:57 पर्यंत किंवा सूर्योदयानंतर स्नान करू शकता. या दिवशी चंद्रग्रहणही आहे. मात्र कार्तिक पौर्णिमेच्या स्नानावर चंद्रग्रहणाचा परिणाम होणार नाही.
कार्तिक पौर्णिमेचे स्नान-दान सुतक काळापूर्वी करावे –
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी तुम्ही कार्तिक पौर्णिमेला स्नान आणि दान करू शकता. जे कार्तिक पौर्णिमेला व्रत ठेवतात, ते सुतक काळापूर्वीही पूजा करू शकतात. यात कोणाताही दोष येणार नाही.
चंद्रग्रहण समजून घ्या –
आज संध्याकाळी 05.32 पासून चंद्रग्रहण सुरू होईल आणि ग्रहणाचा मोक्ष 06.19 ला होईल. ग्रहणाचा सुतक काल सकाळी 9.21 पासून सुरू होईल. अशा स्थितीत चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी कार्तिक पौर्णिमेला तुम्ही स्नान आणि दान करू शकता. जे व्रत ठेवतात, तेही अशाच प्रकारे पूजा करू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)