पाकिस्तान उद्रेकाच्या उंबरठ्यावर ; राजकीय अराजक माजण्याची चिन्हे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ नोव्हेंबर । पाकिस्तानात मोठे राजकीय अराजक माजण्याची चिन्हे आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय घटनाक्रम बदलत आहेत. पाकिस्तान लष्कराला सध्या सर्वाधिक कठीण काळाला सामोरे जावे लागत आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची राजकीय कोंडी केली जात असताना ते आता लष्कराच्या हातातील बाहुले बनले आहेत. वुड्रो विल्सन सेंटरचे (आशिया) उपनिदेशक यांच्या म्हणण्यानुसार, सध्या राजकीय सत्ता आणि पाकिस्तानातील स्थिती खूपच स्फोटक बनली आहे. त्याचा कधीही उद्रेक होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान इम्रान खान यांनी इस्लामबादकडे लाँग मार्चची घोषणा केली आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते लवकरच लाँग मार्चमध्ये सहभागी होतील.आपल्यावर हल्ला झाल्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान, मंत्री आणि लष्करप्रमुख नसीर यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. पंजाबमध्ये इम्रान खान यांच्या आघाडीचे सरकार आहे; मात्र मुख्यमंत्री परवेझ इलाजी, मेजर जनरल नसीर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यास तयार नव्हते. याचदरम्यान इम्रान खान यांच्या दबावामुळे इलाही एफआयआर दाखल करण्यास तयार झाल्याने पंजाबचे पोलिस महासंचालक सक्कर यांनी राजीनामा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *