महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ नोव्हेंबर । नवी दिल्ली : शिक्षण हा नफा कमावण्यासाठीचा धंदा नाही, त्यामुळं ट्युशन फी ही कायमच आवाक्यात असायला हवी, अशी महत्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली आहे. आंध्र प्रदेश सरकारनं नुकतीच शैक्षणिक फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी याचिकेवर भाष्य करताना कोर्टानं ही टिप्पणी केली.