महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ नोव्हेंबर । संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. यामुळं ईडीला यामुळं मोठा धक्का बसला असून ईडीनं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडं केली आहे. ईडीच्या या विनंतीवर दुपारी ३ वाजता पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. यानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार की त्यांचा मुक्काम वाढणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. (Will Sanjay Raut come out of jail or will stay be extended need Know developments in court)
पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाला ईडीनं तात्पुरती स्थिगिती देण्याची मागणी केली आहे. कारण या निकालाचा थोडाफार अभ्यास करुन आम्हाला हायकोर्टात आव्हान देता येईल असं ईडीनं म्हटलं आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर आजच हायकोर्टाचं कामकाज सुरु झालं आहे. किमान रविवारपर्यंत राऊत यांच्या जामीनाला स्थगिती देण्यात यावी, जेणे करुन आम्ही सोमवारी हायकोर्टात दाद मागू शकू असं ईडीनं कोर्टात म्हटलं आहे.
न्या. एम. जी. देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला तसेच म्हटलं की, “निकालाला स्थगिती देण्याची कायद्यात कुठलीही तरतूद नाही आणि मुंबई सत्र न्यायालयाला निकाला स्थगिती देण्याचे पीएमएलए अंतर्गत अधिकार नाहीत, ते हायकोर्टाला अधिकार आहेत. न्या. देशपांडे यांनी आपल्या निर्णयावर ईडीनं युक्तीवाद केल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. दुपारी ३ वाजता जेवणाच्या सुट्टीनंतर माझ्या निकालात तुमच्या या भूमिकेचा समावेश करु असंही न्यायमूर्तींनी ईडीच्या वकिलांना सांगितलं.
बाहेर येणार की मुक्काम वाढणार?
त्यामुळं दुपारी ३ वाजता जर पीएमएलए कोर्टानं या निर्णयाला स्थगिती दिली तर कदाचित संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम काही दिवस वाढू शकतो अन्यथा संध्याकाळी संजय राऊत बाहेर येतील. पण जामिनाच्या नेमक्या अटीशर्ती काय आहेत ते संध्याकाळी समोर येईल. पण संजय राऊतांसाठी त्यांच्या कुटुंबियांसह शिवसैनिकही सज्ज असल्यानं कोर्टात गॅरंटीसाठी राऊतांना कुठलीही अडचण येणार नाही.