संजय राऊतांना जामीन अन् रोहित पवारांचं सॉल्लिड ट्विट,VIDEO !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ नोव्हेंबर । ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. संजय राऊतांना (Sanjay Raut) जामीन मिळताच ठाकरे गटाच्या गोटात जल्लोष साजरा केला जात आहे. राऊतांच्या घरीही तयारी सुरू असून राज्यभरातील कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. तर, शिवसेनेच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राऊतांना जामीन मिळताच एक सूचक व्हिडिओ ट्विट केला आहे. (sanjay raut bail)

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊतांना अटक केली होती. तेव्हापासून जवळपास १०२ दिवस राऊत तरुंगात होतो. संजय राऊत तुरुंगात असताना ठाकरे गटाची भूमिका मांडणारा प्रभावी वक्ता नसल्याची चर्चा होती. मात्र, आता राऊत तुरुंगातून बाहेर आल्यास ते पुन्हा जोमाने ठाकरे गटाचा अजेंडा लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम कराताना दिसणार आहेत. संजय राऊत यांच्या याच आक्रमक बाण्याचा धागा पकडत रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत एक पिंजरा दिसत असून त्यातून एक वाघ बाहेर येतानाचं दृष्य आहे. पिंजऱ्यातून वाघ बाहेर आला, अशा आशयाचं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे. रोहित पवारांच्या या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. तर, अनेकांनी त्यांच्या या आयडियाचे कौतुक केलं आहे. रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट करत सत्यमेव जयते असं लिहलं आहे. तर, संजय राऊत यांना टॅगदेखील केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *